माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. पंतप्रधान दोनचं लोकांवर बोलतात. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं उद्धव ठाकरे. मी 45 वर्ष महाराष्ट्रमध्ये फिरतोय. माझी लोकं आहेत, तो माझा अधिकार आहे. पण त्यावरूनही मोदींनी आमच्यावर टीका केली, असं शरद पवार म्हणाले. आम्ही शेतीमालाच्या किंमती वाढवल्या असं ते म्हणतात. दहा वर्षापासून सत्तेत ते आहेत. किंमती आम्ही कश्या काय वाढवल्या? असा सवालही शरद पवार यांनी केला.
मी बऱ्याच वर्षांनी आलो आहे. सर्व जण विविध राजकीय भूमिका लोकांसमोर मांडतायत. तो लोकशाहीचा अधिकार आहे. बाकीच्या राज्यांच्या निवडणूका एका दिवसात घेतल्या. मात्र महाराष्ट्रची एकूण 48 खासदारांची निवडणूक 4 टप्प्यात कशी? असा सवाल शरद पवार यांनी केला.
भाषणात देशाच्या पंतप्रधानांनी दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच चित्र कसं असणार हे सांगायचं असतं. पण मोदी ते करत नाहीत. मनमोहन सिंग यांचं राज्य होत तेव्हा ते महागाईबद्दल बोलायचे. ते 50 दिवसात पेट्रोलचे दर कमी करणार होते, 10 वर्ष मोदींचं राज्य आहे आज किती दर आहे पेट्रोलचा? सिलेंडरचा किती आहे?. मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा. मोदींनी वस्तूस्तिथी सांगितली पाहिजे. ते ती सांगत नाहीत, असा हल्लाच त्यांनी चढवला.
आज सर्वत्र भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर करणं ही भूमिका आजच्या सरकारची आहे. विरोधी माणूस, विरोधात कामं करणाऱ्याला तुरुंगात टाकायचं कामं मोदींच्या आशीर्वादाने चालू आहे. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. अरविंद केजरीवालांनी दिल्लीत क्रांती केली. अतिशय चांगला माणूस. चुकीचं असेल तिथे टीका करणं हा केजरीवाल यांचा स्वभाव आहे. त्यांनी टीका केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं. याचं अर्थ हे राज्य लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे चाललं आहे, असं पवार म्हणाले. त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासह अनेकांवर टीका केली, आज राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.