संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको, अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!

| Updated on: Mar 05, 2022 | 1:12 PM

या संकटात कुणी काय केलं काय नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही. या मुलांना कसं वाचवलं पाहिजे यावर लक्ष देण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांकडून अधिक आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको, अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!
Sharad Pawar
Image Credit source: TV9
Follow us on

पुणेः रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात (Russia Ukeaine war) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारचे (Indian Government) प्रयत्न सुरु आहेत. भारतात काही विद्यार्थी परतले आहेत, त्यावर आपण काय केलं याची चर्चा करण्यापेक्षा अजूनही तिथे अकडलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, यावर लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिला. ते आज पुण्यात पत्रकारांना संबोधित करत होते. युक्रेनमध्ये अजूनही अनेक विद्यार्थी अडकले असून त्यांच्याशी माझं बोलणं सुरु आहे. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत, त्या जाणून घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार पुण्यात बोलताना म्हणाले, ‘ रशिया युक्रेनच्या युद्धात स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. माझं केंद्र सरकारशी बोलणं झालं. तेथे अडकलेल्या भारतीयांना इथे आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जे जे करत आहे ते करत आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. देशाच्या दुतावासाने त्यांना सांगितलं युक्रेनच्या सीमेच्याबाहेर येता येईल असा निर्णय घ्या. पाच ते सहा तास चालावं लागेल इतक्या अंतरावर सीमा आहे. जायला आमची तयारी आहे. भयंकर थंडी आहे. गोळीबार सुरू आहे. आम्ही कसं जाणार असं विद्यार्थी म्हणत आहे. त्यामुळे ते अडकले आहे. म्हणून

युक्रेन हे शिक्षणाचं माहेरघर

शरद पवार यांनी युक्रेनला आपण भेट दिल्याचं यावेळी सांगितलं, ते म्हणाले, युक्रेन हा वेगळा देश आहे, सुंदर देश आहे. दोनदा तीनदा गेलो होतो. पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे. तसं युक्रेन शिक्षणाचं माहेरघर ओळखलं जातं.म्हणून विद्यार्थी जातात. मात्र सध्या सुरु असलेल्या संकटामुळे स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. ‘

युक्रेनी नागरिक भारतीयांवर नाराज

या संकटात कुणी काय केलं काय नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही. या मुलांना कसं वाचवलं पाहिजे यावर लक्ष देण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांकडून अधिक आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.युक्रेनमधील भारतीयांशी चर्चेनंतर तेथील नागरिक आपल्या भारतीयांवर नाराज असल्याची माहिती मिळाली असल्याचं पवार यांनी सांगितलं. युक्रेनविरोधात रशियाने सुरु केलेल्या हल्ल्यांबाबत भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे युक्रेनी नागरिक भारतीयांवर नाराज आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

इतर बातम्या-

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण

CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, पाय घसरुन पडलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं