कोल्हापूर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी (ncp) जातीवाद पसरवत असल्याची टीका केली. राष्ट्रवादीच्या गेल्या चार पाच वर्षाच्या वाटचालीचा त्यांनी उल्लेक केला. ते काही म्हणू शकतात. त्यांच्या तोंडाला कुणी काही मर्यादा आणू शकत नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर केली. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील राज्यातील नेतृत्वाची यादीच दिली. राष्ट्रवादीचं नेतृत्व राज्यात कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद घ्या. पहिल्यांदा मला वाटतं छगन भुजबळ नेते होते. नंतर मधुकर पिचड नेते होतेय ते आदिवासी होते. भुजबळ कोणत्या समाजाचे सर्वांना माहीत आहे. अरुण गुजराथी होते. यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली. याचं कारण त्यांना 30 वर्ष विधीमंडळात येऊन झाली. 30 वर्ष काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी त्यातून ही निवड झाली. तशी सदस्यांची मागणी होती, असं सांगतानाच इतर जातीजमातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा दृष्टीकोण राष्ट्रवादीचा आहे आणि पुढेही राहील, असं शरद पवार म्हणाले.
एक गोष्ट चांगली झाली. बरेच वर्ष ते भूमिगत झाले होते. याचा काही अंदाज येत नव्हता कुणाला. पण ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेत दिसलं. त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटाही शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला.
राज यांनी उत्तर प्रदेशचं कौतुक केलं. मघाशीच सांगितलं ते काहीही बोलू शकतात. उत्तर प्रदेशचं कौतुक करायला त्यांना काय दिसलं मला माहीत नाही. उत्तर प्रदेशात काय काय घडलं अलिकडच्या काळात. निवडणुकीचा निकाल वेगळा लागला त्याची कारणं वेगळी आहे. लखीमपूरला शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. योगींच्या राजवटीत. अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असं ठाकरे म्हणत असतील तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार असं कधी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
मोदीच्या संदर्भातील काय काय भूमिका मांडत होते ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यात काही तरी बदल झालेला दिसतो. हा गुणात्मक बदल त्यांच्यात झालेला दिसतो. सध्या मोदीच्या बाबतची भूमिका त्यांनी आज घेतली. उद्या काय होईल सांगता येत नाही. पण आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अलिकडे आपण पाहिलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड
Kisan Credit Card : कार्डमुळे वाढणार शेतकऱ्यांचे Credit, कार्ड नेमके मिळवायचे कसे ? घ्या जाणून