मुंबई : आजच राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुखमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हेही (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहे. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी जबाबदारी पडली. त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांना शुभेच्छा दिल्या. अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा होतो. तो कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी असेल. पण शपथ घेतल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो. राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही अपेक्षा आहे मी त्यांना बोलून दाखवली. त्यासाठी त्यांना अंतकरणापासून शुभेच्छा दिल्या, असे शरद पवारही यावेळी म्हणाले आहेत.
यात एक स्थानिक बाब आहे. ती म्हणजे आताचे मुख्यमंत्री ठाण्याचे प्रतिनिधी आहे. अनेक वर्ष त्यांचं ठाण्यातील त्यांचं अनेक वर्ष काम आहे. मूळ ते ठाण्याचे आहे. योगायोग असा यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री सातारचे होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. माझं मूळ गाव साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात आहे. त्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे सातारा जिल्ह्यातील होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्याचे होते. आता ज्यांनी शपथ घेतली तेही साताऱ्याचे आहे. त्यामुळे साताऱ्याला लॉटरी लागली असं म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही. असेही पवार म्हणाले आहेत, यावेळी बोलतना पवारांनी सातारा जिल्ह्याला मिळालेल्या मुख्यमंत्रिपदांचा पूर्ण इतिहास सांगितला आहे.
तिसरी गोष्ट अशी एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेची पदे स्वीकारण्याची उदाहरणे महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रिमंडळात. शंकरराव चव्हाण अर्थ मंत्री होते. शंकरराव चव्हाणाच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा शंकररावजी माझ्या मंत्रिमंडळात ज्वाईन झाले. शंकररावजी नंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. नंतर ते मंत्री झाले. त्यानंतर अशोकराव चव्हाण सध्याचे मंत्री. तेही मुख्यमंत्री होते. ते मंत्री झाले. त्यामुळे अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडली आहे. त्यामुळे देवेंद्र यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही, असे विधानही देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत पवारांनी केलं आहे. तर फडणवीस पुन्हा आलेत असं मी म्हणणार नाही, निवडणुकीत निवडून पुन्हा आले असते, तर वेगळं झालं असतं, असेही ते म्हणाले आहेत.