महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा प्रचार टीपेला पोहचला आहे. विविध नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता प्रचारात नेते अनेकदा पातळी सोडून बोलत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यात दोन्ही नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने शायना एनसी यांना मुंबादेवी येथून उमेदवारी दिली आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी आम्हाला इम्पोर्टे माल नको असे विधान केले होते. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हा महिलांचा अपमान आहे असा आरोप करीत हंगामा केला आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रथमच आपले मत मांडले आहे.
शरद पवार आज बारामतीत पारंपारिक पद्धतीने पवार कुटुंबियांच्या पाडावा मेळाव्यात उपस्थित झाले. या मेळाव्याला यंदा अजितदादा आले नाहीत. अजितदादा यांनी यंदा स्वतंत्रपणे पाडवा साजरा केला आहे. यंदा पवार कुटुंबिया दोन स्वतंत्र दिवाळी पाडवे प्रथमच साजरे करण्यात येत आहेत. या वेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलले आहे.शरद पवार म्हणाले की अरविंद यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. व्यक्तीगत हल्ला होता असं आपल्याला वाटत नाही असेही शरद पवार या संदर्भात म्हणाले आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले की कारण नसताना निवडणुका समोर असताना वाद निर्माण केला जात आहे. सत्ताधारी पक्षला आपल्याला संधी मिळण्याची शक्यता नाही असे वाटत असल्यामुळे असे प्रश्न उपस्थित करणं सुरु आहे असेही पवार यावेळी म्हणाले.या संदर्भात संवैधानिक संस्थांनी त्यावर भाष्य करणं हे निवडणुका पाहून केलेला उद्योग आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र याचवेळी स्त्रियांबद्दल किंवा कुणाबद्दल बोलताना काळजी घ्यावी हे मात्र मला मान्य आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.