मुंबई : राज्यात आणि देशात सध्या जाती धर्माच्या राजकारणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी राज ठाकरे (Raj Thackeray speech) यांनी राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीय राजकारण वाढल्याचा आरोप पुन्हा केला. त्यानंतर यावरूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत पुन्हा एक मोठा आरोप केला आहे. देशामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली (Racist politics) समाजामध्ये दुफळी होईल याचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप पवारांनी पुन्हा केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभ्यासक्रमातील बदलांवरून पवारांनी विचारसरणी बिंबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र आता पुन्हा जातीपातीच्या राजकारणावरून राजकारणात माहोल तापला आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “या सगळ्या काम करणाऱ्यांना नेहमी साथ द्या. जात-पात, धर्माचे राजकारण करू नका. देशामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली समाजामध्ये दुफळी होईल याचा प्रयत्न केला जातोय. पण केवळ विकास व लोकांचा संसार, नव्या पिढीचे चित्र बदलायचे, आपला भाग बदलायचा हे नजरेसमोर ठेवून चांगल्या कामाला साथ द्या.” असा आशयाचे ट्विट पवारांकडून करण्यात आलंय. त्यामुळे यावरही आता जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
या सगळ्या काम करणाऱ्यांना नेहमी साथ द्या. जात-पात, धर्माचे राजकारण करू नका. देशामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली समाजामध्ये दुफळी होईल याचा प्रयत्न केला जातोय. पण केवळ विकास व लोकांचा संसार, नव्या पिढीचे चित्र बदलायचे, आपला भाग बदलायचा हे नजरेसमोर ठेवून चांगल्या कामाला साथ द्या.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 3, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन देशाचा विकास करणारे सरकार आहे. मुस्लिम समाजाला संरक्षण देणारे; समान हक्क देणारे; मुस्लिमांचा विश्वास जिंकणारे सरकार आहे. पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर शरद पवारांनी धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा आहे.असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.. कर्नाटकात विशिष्ट धर्माच्या लोकांच्या दुकानातुन वस्तू खरेदी करू नका. असा फतवा काही संघटनांनी काढला असून त्याचा संदर्भ देऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर धर्मांधतेचा आरोप केला होता.तो आरोप खोडुन काढताना ना रामदास आठवले यांनी मोदी हे सर्व जाती धर्मियांना समान न्याय देणारे पंतप्रधान आहेत असे रामदास आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास सबका विश्वास या अजेंड्यावर सरकार चालवीत आहेत. संविधानाला राष्ट्रग्रंथ मानून काम करीत आहेत. कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची भूमिका नसून सर्वांना न्याय देण्याची मोदींची भूमिका आहे असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रमजान च्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या रिपब्लिकन पक्षातर्फे देशभरातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा देत आहे.भारताच्या विकासासाठी मजबुती साठी हिंदू मुस्लिमांनी ऐकत्र आले पाहीजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. शरद पवार हे जातीवादी नाहीत मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक दिसतात असे रामदास आठवले म्हणाले.