हजामत महागली, सलूनवाल्यांनी किती वाढविले दर पाहा?

| Updated on: Jan 20, 2025 | 6:11 PM

नवीन वर्षांत सलुनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला आहे. यामुळे सलुनमध्ये जाऊन हजामत करणे महाग पडणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा फार पडणार आहे.

हजामत महागली, सलूनवाल्यांनी किती वाढविले दर पाहा?
Follow us on

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. या महिन्याच्या २६ जानेवारी पासून सलूनच्या दरात २० टक्के दरवाढ होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. सलुन व्यावसायिकांनी वाढत्या महागाईमुळे कॉस्मेटिक वरील जीएसटी, दुकानाचे भाडेदर आणि वीजेचे वाढलेले दर यामुळे हि दरवाढ होणार आहे.सलून ब्युटी पार्लर असोशिएशन नाभिक संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाभिक संघटनेच्या या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच सलूनमध्ये केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे. वाढती महागाई आणि मुलांचे शिक्षण आदी अडचणीमुळे कामगारांना पगार देणे अवघड बनलेले आहे.त्यामुळ सलून व्यावसायिकांनी २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारी पासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉस्मेटिकवरील जीएसटीचे दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सलुनचे साहित्य प्रचंड महाग झाले आहे. यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश अतकरे यांनी सांगितले आहे.

यामुळे सलुनचे दरवाढ

आता सलूनचे दर वाढविण्यात आल्याने साधी कटिंगसाठी १०० रुपये आणि साधी दाढीसाठी ७० रुपये द्यावे लागणार आहे. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. तर दुकानाचे भाडे, वीजेची दरवाढ आणि सर्व साहित्यात दरवाढ झाल्याने सलुनचे दर वाढविण्यात आल्याचे सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश अतकरे यांनी म्हटले आहे. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. साधी कटिंग १०० तर साधी दाढीकरीता द्यावे लागणार ७० रूपये तसचं इतरही सेवेत दरवाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नवे दर कसे आहेत ?

साधी कटिंग – १०० रुपये

प्रोफेशनल कटिंग – १२० रुपये

साधी दाढी – ७० रुपये

डेनिम दाढी – ८० रुपये

वेगवेगळ्या प्रकारचे मसाज – ८० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत दरवाढ