चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून नवी चूल मांडण्यात आली आहे. सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून स्वतंत्र कार्यालय उभी केली जात आहे. मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून हायटेक लुक असलेले कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. संपर्क कार्यालयाचे कामही अंतिम टप्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्घाटणाच्या प्रतिक्षेत आहे. 21 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे. अद्यावयात सुविधा असलेले हे कॉर्पोरेट लुकचे कार्यालय खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे. नाशिकच्या शालीमार येथील गंजमाळ परिसरात हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हे संपर्क कार्यालय तयार करण्यात आले आहे.
शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यावर स्वतंत्रपणे कारभार करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाने संपर्क कार्यालय सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
खासदार हेमंत गोडसे यांचे गंजमाळ येथे असलेल्या कार्यालयाच्या बाजूलाच हे कार्यालय साकरण्यात आले असून जवळच उद्धव ठाकरे गटाचे विभागीय संपर्क कार्यालय आहे.
शालीमार परिसरात शिवसेनेचे दोन्ही कार्यालय जवळाजवळ असल्याने दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख, मंत्री, आमदार, खासदार यांनी बैठक हॉल तयार करण्यात आला आहे.
याशिवाय सोशल मीडियासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. कार्यालयातील स्टाफसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात बैठका किंवा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने विशेष आसन व्यवस्था करण्यात आली असून त्याचे काम देखील पूर्णत्वास आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यालयाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली असून जनतेच्या सेवेसाठी कार्यालय असणार असल्याचे देखील गोडसे यांनी म्हंटले आहे.