शिंदे गटाचे मंत्री थेट महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर; मराठी माणसांचा आवाज दुमदूमणार…

| Updated on: Dec 15, 2022 | 3:55 PM

बेळगाव शहराजवळील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील शिनोळी गावामध्ये शंभूराज देसाई यांची सभा होणार आहे. मंत्री शंभूराज देसाई सीमाभागाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचाही दौरा करणार आहेत.

शिंदे गटाचे मंत्री थेट महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर; मराठी माणसांचा आवाज दुमदूमणार...
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे आता सीमावादावर पडदा पडण्याची आशा व्यक्त केली जात आहे. एकीकडे सीमावाद प्रश्नावर आशावाद निर्माण झालेला असतानाच शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई सीमाभागाचा दौरा करत असल्याने सीमाभागातील मराठी माणसांना महाराष्ट्र आपल्यासोबतच असल्याचा विश्वास मिळाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचातींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते विविध भागांचा दौरा करत आहेत. त्याच धर्तीवर आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई सीमाभागाचा दौरा करणार आहेत.

बेळगाव शहराजवळील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील शिनोळी गावामध्ये शंभूराज देसाई यांची सभा होणार आहे.
मंत्री शंभूराज देसाई सीमाभागाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचाही दौरा करणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात दौरा आणि इतर कार्यकक्रमानिमित्त शंभूराज देसाई दौरा करणार आहेत. शंभूराज देसाई सीमाभागाच्या दौऱ्यावर उद्या असणार असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्नही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे सीमावादावर पडदा पडणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यातच आज शंभूराज देसाई सीमाभागाच्या दौऱ्यावर असल्याने मराठी भाषिकांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमाभागातील दौरा काढला असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका असणाऱ्या गावांचे लक्षही या दौऱ्याकडे लागून राहिले आहे.