मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तर सरकार पडेल असा इशाराही दिला होता. मात्र, यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते जरी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असा टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे काहीही बोलले नाहीत. काही वक्तव्य माझ्या आणि भुजबळ यांच्याकडून आली. यावर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी विसंगत वक्तव्य करु नये असं सांगितलं. एकाच सरकारमधल्या मंत्र्यांची विसंगती नको. जे ठरलेलं आहे आणि घडलेलं आहे तेच बोला अशी खेळीमेळीत चर्चा झाली. सगळ्यांची भूमिका एकच आहे यासंदर्भात चर्चा झाली. मी जे बोललो तेवढंच घडलं असे त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात माहिती सांगितली आहे. उदाहरण म्हणून पणजोबा, खापरपंजोबा, वंशावळीत पुरावा आढळला तर त्यांनाच कागदपत्र तपासून दाखले द्यावे असा निर्णय झालाय. त्यावर सरकार ठाम आहे. आमचं मत सर्वोच्च न्यायालयात मांडू. राज्याचे एजी आपली भूमिका मांडतील. कुठल्याही समाजाला धक्का लावायचा नाही हीच आमच्या आरक्षण देण्याची बेसलाईन आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यात मार्गदर्शक मंडळ नियुक्त केले आहे. केयुरेटिव्ह पिटिशनसंदर्भात हे मंडळ आम्हाला सल्ला देतील. दिवाळीनंतर दिल्लीला जाऊन क्युरेटिव्ह पिटिशनसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. गेले वर्षभर आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. काही गोष्टी माध्यमांसमोर बोलायच्या नसतात. ग्रामपंचायतीत आम्हाला अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूनं आहे हे कळलंय असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांना गेल्या दीड दोन वर्षात कोणी तरी चांगलं म्हंटलंय का? बाकी सगळेच वाईट आणि विश्वज्ञानी मी एकटाच अशा त्यांचा आविर्भाव असतो. आयोग, न्यायालय स्वायत्त असतात हे त्यांना कळलं पाहिजे. राऊत यांचे जे कोणी खबरे आहेत तेच त्यांना अडचणीत आणतील. चार टर्म खासदार असं ते जे काही बोलले त्याचे आम्हाला आश्चर्य वाटतं. राऊत यांनी जे काही आरोप केले ते त्यांनी सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असं मुश्रीफ बोलले. मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. राऊतांना दुसऱ्यावर आरोप करण्याचं काम करणं नीट जमतं. त्यांना तेच काम दिलं आहे. जे घडलं नाही ते भासवलं जातंय. त्यामुळे आता राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.