नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात दाखल झाले आहे. त्यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा म्हंटलं आहे. त्याच मुद्द्यावर बाळसाहेबांची शिवसेना अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचे नाणे जुणं झालं आहे, संजय राऊत आता ताकदीचे राहिले नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघू लगेच लक्षात येतं, संजय राऊत यांचे नाणं जुणं झालेले आहे ते आता वाजणार नाही असा दावा शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी केला आहे. संजय राऊत यांना काय गौप्यस्फोट करायचा आहे करू द्या, आमची टीम तिथे तयार आहे, तिथे काय करायचे करू द्या आम्हीही तयारीतच आहोत असे शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हंटले आहे. इतकंच काय उद्धव ठाकरे समोर आले तर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र करणार असंही गोगवले यांनी म्हंटले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत हे देखील नागपुरात दाखल झाले आहे.
उद्धव ठाकरे यांनी ज्या हॉटेलात मुक्काम केला आहे, तिथेच शिंदे गटाच्या आमदारांनी मुक्काम केला आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर असतांना मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता त्यावर भरत गोगावले यांनी संजय राऊत यांचे नाणं जुनं झालं आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही असेही गोंगावले यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांच्यावर भरत गोगावले यांनी हल्लाबोल करत भास्कर जाधव यांनाही चिमटा काढला आहे, दरम्यान बाळसाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.