असे कसे बरे दादा नवलपरी घडले, राजकुमारही घराबाहेर पडले, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे गटाकडून टीका

| Updated on: Oct 27, 2022 | 5:04 PM

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

असे कसे बरे दादा नवलपरी घडले, राजकुमारही घराबाहेर पडले, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे गटाकडून टीका
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज नाशिक (Nashik ) आणि पुणे (Pune) दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी नाशिकच्या सिन्नर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आदित्य ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग आणि शेतकऱ्यांना ठेकेदारांना दिलेल्या त्रासावरुन हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरच शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर जहरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नरेश म्हस्के यांनी याबाबत एक ट्विट करत आदित्य ठाकरे यांना लक्ष करत जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला म्हस्के यांनी उडत उडत दौरा असेही संबोधले आहे.

माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे आज नाशिकच्या सिन्नर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, यावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केले होते.

यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर येऊनच त्यांच्या समस्या कळतात, समृद्ध महामार्गाचे काम चांगलं झाले नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

यामध्ये नरेश म्हस्के म्हणाले, असे कसे बरे दादा नवलपरी घडले, राजकुमारही घराबाहेर पडले, अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली.

नाइटलाईफसाठी स्वारी, सातच्या आत घरी अशा आशयाचे ट्विट करत म्हस्के यांनी उडतउडत दौरा असा टॅग देखील वापरला आहे.

एकूणच आज आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दौऱ्यावर शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.