तब्बल 4 कोटींचा कर थकवणाऱ्या ‘या’ विमानतळाला ग्रामपंचायतीची नोटीस, कर भरा अन्यथा…

| Updated on: Jan 15, 2021 | 7:57 PM

शिर्डी येथील विमानतळाने तब्बल 4 कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Shirdi airport tax Panchayat)

तब्बल 4 कोटींचा कर थकवणाऱ्या या विमानतळाला ग्रामपंचायतीची नोटीस, कर भरा अन्यथा...
Follow us on
अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथील विमानतळाने काकडी ग्रामपंचायतीचे तब्बल 4 कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तशी नोटीस काकडी ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनास दिली आहे. विशेष म्हणजेत हे विमानतळ सुरु होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही या विमानतळाने काकडी ग्रामपंचातीला कर दिलेला नाही. त्यामुळे शेवटी येथील ग्रामसेवकांनी थेट विमातळ  व्यवस्थापकाकस नोटीस बजावली. (Shirdi airport has not given the tax of four crore of Kakadi Gram Panchayat)

पाच वर्षांपासून एक रुपयाही भरला नाही

पाच वर्षांपूर्वी काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ उभारण्यासाठी प्रशासनाला जागा दिली. त्यानंतर 2015-2016 साली शिर्डी विमानतळाचे काम पूर्ण झाले. मात्र, पाच वर्षे उलटले असूनही विमानतळ प्रशासनाने ग्रामपंचायतीला कर दिलेला नाही. त्यामुळे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकास नोटीस बजावली. तसेच ग्रामपंचायतीचा कर भरण्यास सांगितले आहे. (Shirdi airport has not given the tax of four crore of Kakadi Gram Panchayat)

थकबाकीचा तपशील

  • शिर्डी विमानतळाचे काम 2015 -16 या वर्षात पूर्ण
  • सन 2016 -17 या वर्षापासून कर आकारणी लागू
  • सन 2016 -17 ते सन 2019 – 20 पर्यंत 2 कोटी 95 लाख 57 हजारांचा कर
  • सन 2020 – 21 या वर्षांत  1 कोटी 69 हजार हजारांचा कर
  • एकूण थकबाकी 4 कोटी 2 लाख 48 हजार 56 रुपये

अन्यथा थेट कारवाई 

दरम्यान, चार कोटी करवसुलीसाठी ग्रामपंचायतीने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनास नोटीस पाठवली आहे. त्यानंतरही विमानतळ प्रशासनाने कराचा भरणा केला नाही; तर ग्रामपंचायतीमार्फत कडक कारवाई केली जाईल, असे ग्रामसेवकांनी सांगितले. तसेच, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 129 प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक बाचकर यांनी दिली. त्यानंतर  आता शिर्डी विमानतळ प्रशासन या नोटिशीवर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Shirdi airport has not given the tax of four crore of Kakadi Gram Panchayat)
सबंधित बातम्या :
जेव्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा पोलीस ठाण्यात ढसाढसा रडतात
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश