नाशिक : दोन दिवसापूर्वी स्पाईसजेटच्या (Spicejet) असमन्वयचा फटका प्रवाशांना (Passenger) बसलेला असतांना आज पुन्हा स्पाईसजेट कंपनीने प्रवाशांना धक्का दिला आहे. शिर्डीचे विमान आता नाशिकमधून उडवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली आहे. शिर्डीवरुन काही तांत्रिक कारणामुळे विमान उडू शकले नाही, त्यामुळे तया सर्व प्रवाशांना शिर्डीवरुन नाशिकला आणण्याची वेळ स्पाईसजेट कंपनीवर आली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील स्पाईसजेट कंपनीचे विमान नाशिकवरुण दिल्ली ला गेले होते, तिथे तब्बल तासाभराच्या प्रतिक्षेनंतर बॅगा आणि सामान नाशिकलाच राहिल्याचे कळविण्यात आले. एकूणच या गोंधळामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. दिललीवरुन अनेकांना जम्मू-काश्मीर आणि इतर राज्यात जायचे होते, काहींना तर परदेशात जायचे असल्याने नाहक फटका सहन करावा लागला आहे.
स्पाईसजेट या कंपनीची आर्थिक स्थिती बिकट आहे, नुकतेच त्यांनी कर्ज काढलेले असतांना स्पाईसजेटचे कर्मचाऱ्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
नाशिक ते दिल्ली झालेला गोंधळ ताजा असतांना आता शिर्डी येथून स्पाईसजेटचे विमान उडू न शकल्याने प्रवाशांना नाशिक येथे आणण्याची वेळ कंपणीवर आली.
शिर्डी येथून तिरूपतीला हे विमान उड्डाण होणार होते, त्यामुळे आता या प्रवाशांना नाशिकवरुन तिरूपतीच्या दिशेने विमान उड्डाण घेणार आहे.
यापूर्वी नाशिकहून टेम्पोने बॅगा आणि सामान मुंबईला नेण्यात आले होते, त्यानंतर रात्रीच्या विमानाने प्रवाशांच्या बॅगा आणि सामान दिल्लीला पाठविण्यात आले आहे.
एकूणच स्पाईसजेट कंपनीच्या कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून नाशिकच्या प्रवाशांना याचा दोनदा अनुभव आला आहे, तिसऱ्या वेळेस अशी घटना घडणार नाही याची खबरदारी कंपनीला घ्यावी लगणार आहे.