नाशिक : शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी असलेल्या रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक होतांना दिसून येत आहे. नाशिकमधील शिवसैनिक (Shivsena) देखील आक्रमक झाले होते. दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहे. शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी देत पुतळ्याचे दहन देखील केले. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालय शालीमार येथे हे आंदोलन करण्यात आले होते. रामदास कदम यांचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवत हल्लाबोल केला आहे.
दापोली येथे एका कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाबद्दल रामदास कदम यांनी आक्षेपार्ह विधान केले होते त्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहे.
नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालय शालिमार या ठिकाणी रामदास कदम यांच्या पुतळ्याच दहन करत शिवसैनिकांनी निदर्शने करत निषेध नोंदवला.
रामदास कदम यांच्या ठाकरे कुटुंबीयांवरील विधानाचे राजकीय पडसाद आता उमटायला लागले असून सेनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
कदम यांच्या विरोधात आता संपूर्ण राज्यात शिवसेनेकडून आंदोलन केले जात असून रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
रामदास कदम हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर देखील कदम यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता तेव्हापासूनच कदम आणि ठाकरे यांच्यात संघर्ष अधिक चिघळला आहे.
कदम हे कधीकाळी मातोश्री जवळचे पदाधिकारी म्हणून ओळखले जायचे, त्यांना सेनेकडून विरोधी पक्षनेते पासून मंत्रीपद देखील देण्यात आले होते.
कदम आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होत असतांना कदम मातोश्रीबद्दल विधान करत असल्याने शिवसैनिक कदम यांच्याविरोधात आंदोलन करीत आहे.