फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं महायुतीचे नेते सांगत आहे. यात शिवसेनेचे 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या नावांची यादी tv9 मराठीच्या हाती लागली आहे. यात शिंदे सरकारमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांचा समावेश आहे. तर ज्या आमदारांचं नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी फिक्स होतं. मात्र मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जे आमदार मंत्री होऊ शकले नाहीत. त्यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावांवर दिल्लीत काल चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात शिवसेनेचे 10 ते 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे सरकारमधील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. तर भरत गोगावले यांचा शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार असल्याची चर्चा वारंवार होत होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते मंत्री होऊ शकले नाहीत. आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाठ यांच्याबरोबरच इतर नावांची चर्चा आहे. जिल्ह्यात तीन नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल आणि विलास भुमरे यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.