रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; शिवसेनेची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

| Updated on: Sep 13, 2022 | 9:28 PM

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी 7 कोटी रूपये उद्धव ठाकरेंना पाठवल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; शिवसेनेची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
उद्धव ठाकरे, नवनीत राणा आणि रवी राणा
Image Credit source: Google
Follow us on

अमरावती :आमदार रवी राणा(Ravi Rana ) यांनी अमरावती पोलीस आयुक्त आणि उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांची बदनामी केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी 7 कोटी रूपये उद्धव ठाकरेंना पाठवल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
आरती सिंह यांच्याकडून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असंही राणा म्हणालेत. उमेश कोल्हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देशच उद्धव ठाकरेंनी दिले होते असे देखील राणा म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर आरोप करतानाच आमच्याकडे या सर्व आरोपांचे पुरावे असल्याचे दावा रवी राणा यांनी केला आहे. आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भातील सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. सर्व ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सीआयडीला देणार असल्याचे राणा म्हणाले.

रवी राणांच्या या आरोपानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. रवी राणा यांच्या विरोधात अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने रवी राणा यांची तक्रार करण्यात आली आहे.

रवी राणा यांनी पोलीस आयुक्त यांच्यावर दर महिन्याला 7 कोटी रुपये पोहचत उद्धव ठाकरे यांना देत असल्याच्या आरोप तथ्य नसल्याचे सांगत रवी राणा यांच्यावर उद्धव ठाकरे यांची बदनामी करत असल्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेय.