नाशिक : अमित शाहांसमोर (Amit shah) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिवा असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केलेल्या टीकेचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी मनमाड येथे खरपूस समाचार घेतला आहे. एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळे यांना सांगण्याची गरज नाही. मित शाह जर सूर्य आहे तर उद्धव ठाकरे यांनी दिलेले एक महिन्यात निवडणुका घेण्याचे दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारावे, निवडणुका घेण्यासाठी सरकार त्यापासून पळ काढतेय. उद्धव ठाकरे यांचे आव्हान पेलू शकत नाही म्हणून असे बेताल बोलत आहे. ज्यातील भाजप दिवे विझलेले आहे अशी जहरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर केली आहे.
अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर असतांना शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत शिवसेना संपवण्यापर्यन्त टीका केली होती.
याच विधानाचा समाचार उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे झालेल्या सभेदरम्यान नुकताच घेतला आहे.
अमित शाह यांच्यावर टीका करत असतांना उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर निवडणुका लावा असे आवाहन केले होते.
याशिवाय शाही राजवटी संदर्भ देत अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांनी लक्ष करत आस्मान दाखवू असा इशारा दिला होता.
याच विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
अमित शाह ही सूर्य असून उद्धव ठाकरे ही दिवा असल्याची तुलना बावनकुळे यांनी केली होती. त्यावरच दानवे यांनी बावनकुळे यांना लक्ष करत पलटवार केला आहे.