नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची राजकीय मैदानावर नेहमीच फटकेबाजी बघायला मिळत असते. मात्र, नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी केल्याचे बघायला मिळाले आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी नाशिकपासून या दौऱ्याला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांच्या हस्ते यावेळी नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात असलेल्या संभाजी स्टेडियमवर क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते होते. राऊत यांनी उद्घाटन केल्यानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. राऊत यांनी बॅट हातात घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवातही केली. राऊत यांचा यावेळी मात्र दुसऱ्याच बॉलला विकेट केली. नंतर मात्र राऊत यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या संजय राऊत यांची राजकीय फटकेबाजी सुरू होण्यापूर्वीच क्रिकेटच्या मैदानावरील फटकेबाजी बघायला मिळाली आहे.
संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असतांना मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते राऊत यांच्या भेटीघेत आहे, यावेळी संजय राऊत वन टू वन मुलाखती देखील घेणार आहे.
याच दरम्यान राऊत हे सिन्नर आणि मनमाड येथे देखील भेट देणार आहे, त्यामुळे राजकीय फटकेबाजी राऊत यांची होणार असून राऊत यांच्या उपस्थित मेळावा देखील पार पडणार आहे.
जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे महाराष्ट्र दौरा करत असून त्याची सुरुवात नाशिकपासून करणार आहे, त्यामुळे राऊत यांच्या दौऱ्याची नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
याच दरम्यान राऊत यांनी क्रिकेटका आनंदही लुटला असून क्रिकेटच्या मैदानावरील फटकेबाजी झाल्यानंतर राऊत राजकीय मैदानात कुणावर फटकेबाजी करणार हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे.