घडामोडींना वेग… राज ठाकरेंच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे ‘शिवतीर्था’वर; मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन की आणखी काही… चर्चांना उधाण

| Updated on: Nov 02, 2024 | 4:37 PM

खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'शिवतीर्था'वर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. माहीम मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

घडामोडींना वेग... राज ठाकरेंच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे शिवतीर्थावर; मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन की आणखी काही... चर्चांना उधाण
Follow us on

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘शिवतीर्था’वर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र ही भेट माहीम विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात असून, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून या मतदारसंघातून सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेनं माघारी घ्यावी, यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

माझं आणि या मतदारसंघाचं नात हे आई आणि मुलाखारखं आहे, त्यामध्ये खंड पडू देऊ नका. मला मुख्यमंत्र्यांचा आर्शीरवाद आहे, आर्शीरवादाशिवाय एबी फॉर्म मिळत नसतो. मला महायुतीचा संपूर्ण पाठिंबा आहे. मी भेटण्यासाठी राजसाहेबांकडे वेळ मागितला आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी त्यांची भेट घेणार आहे. मला खात्री आहे, की ते मला आर्शीरवाद देतील अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरवणकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. महायुतीशी चर्चा न करता राज ठाकरे यांनी आपला उमेदवार उभा केल्यानं हा घोळ झाला आहे. सरवणकर यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल तुटायला नको असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा  झाली? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये.