वरळीत आदित्य ठाकरेंची मोठी खेळी; एकनाथ शिंदेंना धक्का, घडामोडींना वेग

| Updated on: Nov 07, 2024 | 3:39 PM

वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीत पक्षात मोठी फूट पडली आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंची मोठी खेळी; एकनाथ शिंदेंना धक्का, घडामोडींना वेग
Follow us on

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. यातच मोठी बातमी आता समोर येत आहे, ती म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा प्रमुख श्रीकांत जावळे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अन्वर दुर्रानी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्यावर प्रेम करणारे लोक हे पुन्हा एकदा आमच्यासोबत येत आहेत. तुमची निराशा होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो. येणाऱ्या सरकारमध्ये तुमचा निश्चित हातभार लागेल असं मला वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

हे सुद्धा वाचा

वरळीमध्ये कांटे की टक्कर  

दरम्यान यावेळी वरळीमध्ये कांटे की टक्कर पाहयला मिळणार आहे. यंदा वरळी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर मनसेकडून संदीप देशपांडे हे येथून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं मोठं आवाहन असणार आहे.