शिवसेनेच्या आमदारांना तातडीने ‘वर्षा’ बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश, काय घडतंय?

| Updated on: Oct 22, 2024 | 9:14 PM

शिवसेनेच्या आमदारांना वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेच्या आमदारांना तातडीने वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश, काय घडतंय?
शिवसेनेच्या आमदारांना तातडीने 'वर्षा' बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश
Follow us on

शिवसेनेच्या आमदारांना ‘वर्षा’ बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र काही जागांवर तिढा अद्यापही काही आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांना उद्या संध्याकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: आमदारांना एबी फॉर्म देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी ही आज जाहीर होईल आणि दुसरी यादी 26 ऑक्टोबरला जाहीर होईल, असं सांगितलं होतं. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी ते गुवाहाटीला जावून कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. राज्य सरकारकडून कामाख्या मंदिराला व्यवस्थापन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज रात्रीच गुवाहाटीला रवाना होणार आहेत. त्यांच्या हस्ते आज रात्री बारा वाजता कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा होणार आहे.

महायुतीत भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 11 नवे चेहरे सोडले तर सर्व विद्यमान आमदारांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे विरोधातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आणि शिंदे गटाचे उमेदवार कोणकोणत्या मतदारसंघात समोरासमोर येणार ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.