राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, सोबतच आचारसंहिता देखील सुरू आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची वणीमध्ये जाहीर सभा होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरनं आले. यावेळी हेलिपॉडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते वाशिममध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज माझ्या बॅगेची तपासणी केली, मग मोदी, शहा यांच्या बॅगा भरून येतात त्याकडे का दुर्लक्ष होतं? तपास यंत्रणांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत दाखवावी. मोदी, शहा यांच्या बॅगा महाराष्ट्रातून जाताना तपासल्या पाहिजेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला. दोन लाख कर्ज माफी केली होती. मी मुख्यमंत्री असताना कापसाला भाव दिला होता, सोयाबीनला भाव दिला होता. एकवेळा परत महाविकास आघाडीचं सरकार आणा मी कसं सगळं सरळ करतो ते बघा. महाराष्ट्रात नवीन रोजगार येत नाहीये. माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना वाऱ्यावर सोडलं आहे. भेदभाव करतात. आमचा नांगर धारणारा मुलगा उदयाला पंतप्रधान झाला पाहिजे. तुम्ही सर्व जण ताकतीने उभे आहात, कितीही पैसे दिले तरी तुम्ही त्याला बळी पडणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची वणीमध्ये जाहीर सभा होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरनं आले. यावेळी हेलिपॉडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली, त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून आता भाजपचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.