भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या प्रकरणी माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी जिल्हा उपअधीक्षकांना पत्र पाठवलं आहे. “आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच शिवभक्त यांना घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशी पोलीस यंत्रणेसमोरच खासदार नारायण राणे यांनी धमकी दिल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा”, अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. सदर घटनेचे इत्यंभूत चित्रण वृत्तवाहिन्यांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये आलेले आहे. त्यासंबधिताचे चित्रण पत्रासोबत विनायक राऊत यांनी पाठवले आहे
“खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाची गुंडगिरीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर अनेक दहशत, दादागिरी, खून असे गुन्हे या पूर्वीपासून दाखल आहे. त्यांची दहशतवादी प्रवृत्ती आहे. तरी याबाबत सदरच्या जाहीर धमकीच्या अनुषंगाने खासदार नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी”, अशी विनंती विनायक राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.
“बुधवारी, 28 ऑगस्ट 2024 या दिवशी आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, आमदार जयंत पाटील, वैभव नाईक तसेच मी स्वतः आणि महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी आणि शिवभक्त हे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जमिनीवर कोसळलेला पुतळा पाहण्यासाठी गेलो असता, खासदार नारायण राणे यांनी आम्हा सर्वांसमक्ष पोलिसांना सांगितले की, या सर्वांना घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, असे जाहीररीत्या सांगून धमकी दिलेली आहे”, असं विनायक राऊत पत्रात म्हणाले.
“याबाबत मी आपल्या निदर्शनास आणून देतो की, सदरच्या राजकोट किल्ल्यावरील पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाहणीच्या वेळी खासदार नारायण राणे आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी नाहक दादागिरी करीत दहशत माजवून सर्व आमदार आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, वैभव नाईक, राजन साळवी तसेच मी स्वतः आणि उपस्थित शिवभक्तांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.
“नारायण राणे यांनी सर्वांना घरात घुसून रात्रभर एकेकास मारून टाकेन सोडणार नाही, असे जाहीर रित्या पोलिसांना सांगितले आहे. सदर घटनेचे इत्यंभूत चित्रण वृत्तवाहिन्यांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये आलेले आहे. सोबत वृत्तपत्रातील कात्रणे तसेच वृत्तवाहिन्यांच्या चित्रांच्या चित्रफिती पेन ड्राईव्हद्वारे आपल्याकडे सादर करीत आहे”, असं विनायक राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
“खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाची गुंडगिरीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर अनेक दहशत, दादागिरी, खून असे गुन्हे या पूर्वीपासून दाखल आहे. त्यांची दहशतवादी प्रवृत्ती आहे. तरी याबाबत सदरच्या जाहीर धमकीच्या अनुषंगाने खासदार नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी”, अशी विनंती विनायक राऊत यांनी केली आहे.