मुंबईः राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे काँग्रेसच्या संपूर्ण जथ्थ्याचं काल रात्री जंगी स्वागत झालं. आजदेखील नांदेडच्या विविध भागांतून राहुल गांधींसह महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी नांदेडच्या ग्रामीण भागात पदयात्रा काढतील. संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागात काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल. तर देशाच्या उर्वरीत भागांमध्ये खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोलीत सर्वात आधी 5.29 वाजेच्या सुमारास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तसेच वर्धा येथे होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, हे आज स्पष्ट होईल.
Marathi News LIVE Update
राज्याचे कृषीमंत्री आहेत की खूर्चीमंत्री
आदित्य ठाकरे यांची अब्दुल सत्तार यांच्यावर टीका
एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही
राज्यात घाणेरडं राजकारण सुरु आहे
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा-ठाकरे
Marathi News LIVE Update
दिल्लीत सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादीचं दिल्लीतही सत्तारांविरोधात आंदोलन
महाराष्ट्रातील पडसादानंतर देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी आक्रमक
सत्तरांच्या माफीनाम्यावर राष्ट्रवादी नाखूष
सत्तरांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन
Marathi News LIVE Update
अब्दुल सत्तार महाराष्ट्राला लागलेला कलंक
सुषमा आंधारे यांची घणाघाती टीका
महिला आयोगाने गुलाबराव पाटील यांना ही नोटीस द्यावी
आगामी काळात मविआचा मुख्यमंत्री असेल
सत्तार, पाटील यांना सत्तेचा माज-अंधारे
मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत दाखल
10 नोव्हेंबरला भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रा द्वारे मागणी
हर हर महादेव चित्रपटावर छत्रपती संभाजी महाराज यांचा आक्षेप
मात्र चित्रपट सृष्टी आणि अंडरवर्ल्ड संबंध सर्वश्रुत ..
त्यामुळे छ.संभाजी महाराज यांच्या जीविताला धोका
सध्या असलेल्या Y+ ऐवजी छ. संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी
युवा सेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी लावला आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवा सेनेला सुरुंग
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का
सुहेल शर्मा आणि संदीप गिल यांची पुण्यात बदली झाली आहे
पोलीस आयुक्तालयातील जवळपास 4 पोलीस उपायुक्तांची करण्यात आली आहे
बाहेरील जिल्ह्यातून तब्बल 16 अधिकारी पुण्यात आले आहेत….
कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात
या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त आहे.
या अपघातात मृत्युमुखींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ 5 लाख मदत जाहीर केली आहे.