सिंधुदुर्ग – अनेक ठिकाणी निवडणुक जिंकल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, आमदार आणि खासदार यांचे डान्स आपण पाहतो, तसेच प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पध्दतीचे डान्स (dance) आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांना जल्लोषात वेगळं कायतरी करून लोकांच्या मनात घरं करायचं असतं असं आपण आत्तापर्यंत अनेकदा पाहिलं आहे. तसाच प्रकार काल सिंधुदुर्गमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पाहायला मिळाला भाजपच्या (bjp) ताब्यात असलेली नगरपंचायत काल शिवसेनेच्या (shivsena)ताब्यात आल्याने तिथल्या नगरसेवकांना स्वत:ला आवरणं एकदम कठीण होऊन बसलं. त्यांनी चक्क कोंबडा डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमध्ये आमदार नितेश राणेच्या (nitesh rane)ताब्यात असलेली नगरपंचायत ताब्यात आल्याने तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांना अत्यंत आनंद झाला आहे. कारण शिवसेनेचं आणि नितेश राणे यांचे किती मतभेत आहेत हे आपण आत्तापर्यंत वारंवार पाहिलं आहे. त्यामुळे तिथं नितेश राणे यांना यांना हरवणं शिवसेनेला गरजेचं होतं. पण शिवसेनेने जरी नगपंचायत ताब्यात घेतली असली तरी ती राष्ट्रवादी सहभागामुळे घेतली असल्याची देखील काल चर्चा सिंधुदुर्गमध्ये सुरू होती. शिवसेनेच्या सुरात राष्ट्रवादीने देखील सुर मिसळल्याचं पाहायला मिळालं.
कोंबडा डान्सची चर्चा
नगरपंचायत नितेश राणे यांच्या मतदारसंघात येत असल्याने तिथल्या अनेक शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. पुर्वी भाजपच्या ताब्यात असलेली ही निवडणुक ताब्यात मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने अनेक दिवसांपासून कंबर कसली होती. कारण नितेश राणेच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणं हे तिथल्या कार्यकर्त्यांचं ध्येय होतं. दोन्ही पक्षाने एकत्र प्रयत्न केल्याने हे शक्य झाले आहे. तिथली निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली आहे. कारण केवळ एका मतामुळे तिथं भाजपाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपने सुध्दा तिथं सत्ता टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले असतील हे लक्षात येते. चुरशीची निवडणुक जिंकल्यानंतर निघालेल्या रॅलीमध्ये सुरूवातीला काही कार्यकर्त्यांनी डान्स केला. नंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक यांना राहावलं नाही, त्यामुळे त्यांनी देखील कोंबडा डान्स केला.
देवगडमध्ये शिवसेनेचा जल्लोष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कोंबडा डान्स; सिंधुदुर्गमध्ये व्हिडीओची चर्चा pic.twitter.com/jdL8O2Bgtw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
भाजपचा एकामताने पराभव
सिंधुदुर्गमध्ये चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवड झाली. आमदार नितेश राणे यांच्या मदारसंघातील देवगड नगरपंचायतवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला. भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या साथीने खेचून घेतली. अवघ्या एक मताने भाजपला सत्तेपासून रोखलं. एकूण 17 जागांपैकी 8 जागा भाजपला, 8 जागा शिवसेनेला तर 1 निर्णायक जागा राष्ट्रवादीला मिळाली. राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पद देत शिवसेनेने आपला नगराध्यक्ष बसवला. शिवसेनेच्या साक्षी प्रभू अध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत उपनगराध्यक्ष झाल्या. भाजपकडून ही नगरपंचायत खेचून घेतल्यामुळे शिवसेनेचा आनंद मोठा होता आणि चार नगरपंचायत मध्ये एकमेव देवगड मध्ये शिवसेनेचा अध्यक्ष बसला, त्यामुळे शिवसेनेकडून देवगडात जल्लोष होणं साहजिकच आहे.निवडी नंतर देवगड शहरातून मोठी मोठी विजयी रॅली काढण्यात आली.