शिवाजी महाराजांचा साक्षात्कार झाला? राज ठाकरेंनी आईची शपथ घेऊन सांगीतला थराराक किस्सा

| Updated on: Oct 16, 2022 | 8:27 PM

राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताना आजही अंगावर काटा येत असल्याचे सांगीतले.

शिवाजी महाराजांचा साक्षात्कार झाला? राज ठाकरेंनी आईची शपथ घेऊन सांगीतला थराराक किस्सा
Follow us on

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात साक्षात्कार दिल्याचा भास झाल्याचा एक थराराक किस्सा राज ठाकरे यांनी सांगीतला आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताना आजही अंगावर काटा येत असल्याचे सांगीतले.

आजही शिवाजी महाराज्यांच्या नावाचा जयघोष ऐकला की अंगावर शहारे येतात. राज ठाकरेंनी शिवनेरी किल्ल्यावर आलेला अनुभव या मुलाखतीत सांगीतला.

शिवनेरी किल्ल्यावर गेलो असताना मला एक विलक्षण अनुभव आल्याचे राज ठाकरे यांनी सांगीतले. शिवनेरी किल्ल्यावर मी प्रकाशाची एक तिरीप पाहण्यात मग्न आणि एकाग्र असतानाच माझ्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. “इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला” असे असे उच्चार या व्यक्तीने काढले.

मागे वळून पाहिले असता मागे कुणीच नव्हते. मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो. यानंतर मी किल्ल्यावरुन खाली आलो. डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतल्या आणि डोकं शांत केल.

पण माझ्या खांद्यावर हात ठेवणारी ती व्यक्ती कोण? महाराजांनी तर मला साक्षात्कार दिला नाही ना? असे अनेक प्रश्न डोक्यात फिरत होते.

यानंतर मी अनेकदा शिवनेरी किल्ल्यावर गेलो. मात्र, असा अनुभव मला परत कधीच आला नाही. तो अनुभव कायमस्वरुपासाठी माझ्या स्मरणात राहिल्याचे राज ठाकरे यांनी सांगीतले.