बुलडाणा: मांसाहार करा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं. (Shivsena Buldana mla Sanjay Gaikwad distributed Chicken Biryani and boiled egg to corona patients)
नागरिकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांनी आज स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन-बिर्याणी तसेच उकडलेल्या बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्व सरकारी कोविड रुग्णालय त्याचबरोबर खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या संखंने कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आड अंडे, मटण, चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन शासनाने केले. यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा चार दिवसांपूर्वी मांसाहार करण्याचं आवाहन केले होते. त्यामुळे मोठे वादळ ही निर्माण झाले होते. मात्र, त्यावर पडदा पडल्याचे जाहीर करत आज पुन्हा गायकवाड यांनी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी तसेच बॉईल अंड्यांचे वाटप केले. त्यामुळे पुन्हा आता वाद वाढतो की शमतो हे पहावे लागेल.
मांसाहार खा म्हणणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांत्या प्रती दिलगिरी व्यक्त केली. ज्यांची मन दुखावली अशा व्यक्तींची दिलगिरी केली आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केले त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले.
पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवालhttps://t.co/doB5HWItLr#SanjayGaikwad #Nonveg #NarendraModi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2021
संबंधित बातम्या:
Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं
(Shivsena Buldana mla Sanjay Gaikwad distributed Chicken Biryani and boiled egg to corona patients)