डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असणार, त्यानंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. 4 तारखेला डी – मोदी नेशन करणार आहेत. मोदींना सभा घेऊ द्या पंतप्रधान म्हणून तुमच्या शेवटच्या सभा आहेत. 4 तारखेला त्यांची सत्ता जाणार आहे. भाजपच काय होईल माहिती नाही. 75 वर्षे रिटायर्मेंटची आहेत. 2 वर्षांनी तुम्ही 75 वर्षांचे होणार नंतर भाजपचं काय होईल. देशात भाजपची 2 खासदार होती तेंव्हा शिवसेनेन साथ दिली. अस्सल भाजपच्या विचारांच्या लोकांना हे पटतंय का?, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.
आमच्यावर बोलताना तुमचा तोल ढासाळतोय ते सांभाळा… बोलायचं म्हटलं तर मी पण श्याम प्रकाश मुखर्जींवर बोलू शकतो. पण त्याने लोकांचे मुद्दे सुटणार आहेत का? साधा लसूण 400 पार गेला आहे. यांच्या भुलथापा आता बस झाल्या. मला भाजपची काळजी आहे. 4 तारखेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार हे निश्चित आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपची अनेक लोक सांगतात हे व्हायला नको म्हणून पण तुमच्या लोकांनी हे घडवलं. एका दिवशी नकली संतान म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी डोळा मारायचा. 10 वर्षे हा माणूस झोपलाच नाही. भाजपला सांगतो यांना झोपू द्या… गजनी सरकारच्या हातात सत्ता देणार का? मी अक्षय कुमारला सांगणार मोदींची मुलाखत घ्या आणि आंब्या बरोबरच टरबूज कसा खायचा विचारा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
आज अमित शाह कुठे तरी बोलले की गो हत्या करणाऱ्यांना उलट टांगू… मग 10 वर्षे काय तिरकं डांगलं होतं का? मणिपूरमध्ये मातेचं रक्षण का केलं नाही? सावरकरांचे गाई बद्दलचे विचार काय होते मोदींनी तपासावं टोपी घालणाऱ्याला आणि घालणाऱ्याला दोघांना सुध्दा डोक नव्हतं. मगाशी मी येत असताना आपली निशानी चोरून शिरचोरी करत होते. 4 तारखेपर्यंत थांबा पैशाच्या फुग्याला टाचणी मारतो. गद्दारा विरोधात निसटता विषय नकोय. असा गद्दार गाडा की कल्याण डोंबीवलीत तपुन्हा गद्दारी वर आली नाही पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत केलं.