मोदी-शाहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव – उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 20, 2024 | 1:28 PM

मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव आहे, उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असंही करतील, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. मात्र ते आम्ही कधीच होऊ देणार नाही. मराठी माणूस एकवटला तर अनेकांच्या डोक्यात घुसलेला अहंकार नेस्तनाबूत करू शकतो.

मोदी-शाहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा  डाव - उद्धव ठाकरे
Follow us on

धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर, जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे, तेही ५०० फुटांचं घर मिळालं पाहिजे अशी शिवसेनेची आग्रही भूमिका कायम आहे. एक बेसुमार काढून अडानींना द्यायचा त्यांचा (सरकारचा) डाव आहे, तो आम्ही उधळून लावणार आहोत. तो डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही.

मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव आहे, उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असंही करतील, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. मात्र ते आम्ही कधीच होऊ देणार नाही. मराठी माणूस एकवटला तर अनेकांच्या डोक्यात घुसलेला अहंकार नेस्तनाबूत करू शकतो. मराठी माणूस मुंबई वाचवतो.

मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची, आणि मुंबईला भीकेला लावायचं हे यांचं (सरकारचं) कारस्थान आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असे उद्वव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

फसव्या योजनांना जनता भुलणार नाही

हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडतंय. त्यांना असं वाटतंय की आत्तापर्यंत त्यांनी केलेला कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून त्यांना मतदाना करेल अशी त्यांना वेडी आशा आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.

बातमी अपडेट होत आहे.