राजाश्रय असल्याशिवाय पुण्यात ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही – संजय राऊत

| Updated on: Jun 29, 2024 | 10:10 AM

पंजाबच्या बरोबरीने पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र बनलं आहे. पुण्यातील एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं. पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्याचं पाठबळ असल्याशिवाय पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणाच ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही.

राजाश्रय असल्याशिवाय पुण्यात ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही -  संजय राऊत
Follow us on

पंजाबच्या बरोबरीने पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र बनलं आहे. पुण्यातील एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं. पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्याचं पाठबळ असल्याशिवाय पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणाच ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही. हे ड्रग्स गुजरात वरून येत आहेत. नाशिक आणि पुणे ही ड्रग्सची राज्यातील महत्वाची केंद्र आहेत, अशी टीका संजय राऊत केली. पब, बार पाडताय, बुलडोझर चालवताय, पण त्याने ड्रग्सचा व्यवहार थांबणार आहे का ? असा सवाल विचारत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कारवाईवर टीकास्त्र सोडलं.

लाडले भाऊ योजना वगैरे ठीक आहेत पण आजच्या काळात घराघरातील भाऊ डे ड्रग्स च्या आहारी गेले आहेत, असा टोलाही त्यांनी अर्थसंकल्पातील योजनांच्या घोषणांवरून लगावला.

तर लोकसभेत 25-30 जागा वाढल्या असत्या

आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी सुनावले. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचं हे म्हणणं योग्य असल्याचं सांगत राऊत यांनी दुजोरा दिला.
विधानसभा निवडणुकीत महाविका आघाडीला पूर्ण बहुमत याविषयी आमच्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, हे लोकसभा निवडणुकांमध्ये ठरवलं असतं तर देशात किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या, असा दावा राऊत यांनी केला.

कोणतंही सरकार किंवा संस्था हे बिनचेहऱ्याचं असू नये. आपण कोणासाठी मतदान करतोय, हे लोकांना कळायला हवं. आम्ही (मविआ) या विषयावर बसून चर्चा करू तेव्हा निर्णय घेऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केलं. चेहरा कोण याविषयी आमच्यात मतभेद नाहीत. तिघांनी एकत्र निवडणूक लढल्यावर लोकसभेत काय निकाल लागला, ते सर्वांन पाहिलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आम्ही तिघेही पक्ष एकत्र निवडणूक लढवू. विधानसभेच्या साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

गरज सरो, वैद्य मरो हे भाजपचं धोरण

गरज सरो, वैद्य मरो हे भाजपचं धोरण आहे, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातही त्यांची ही भूमिका आहे. शिवसेनेने 25 वर्षं त्यांच्यासोबत काम केलं, पण आम्हाला जो अनुभव आला, तोच देशभरात इतरांनाही आला. आंध्रमध्ये, ओरिसामध्ये पटनाईक यांना अनुभव आला. भाजपाने अनेक ठिकाणी लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि गरज संपवल्यावर फेकून दिलं, अशी टीका राऊत यांनी केली .