हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो… राऊतांवर कोणाचा हल्लाबोल?

| Updated on: Aug 12, 2024 | 12:10 PM

आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंतर लाडका भाऊ योजना अशा योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र सरकारच्या या योजनांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीतील मतांसाठी सरकारने हे योजनांचे आमिष दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला

हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो... राऊतांवर कोणाचा हल्लाबोल?
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले असून, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही जोरदार सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध योजनांची देखील घोषणा केली गेली. आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंतर लाडका भाऊ योजना अशा योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र सरकारच्या या योजनांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीतील मतांसाठी सरकारने हे योजनांचे आमिष दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना ( उबाठा गट) खासदार संजय राऊत यांनी देखील या योजनांवर वेळोवेळी टीका केली आहे. मात्र आता त्यांच्या या टीकेला महायुतीतील एका नेत्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. ‘ लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केले. पण अश्या शुभ कामात काही अशुभ लोक नावं ठेवतात’ अशी टीका दाद भुसे यांनी केली.

पुढील पाच वर्षे सुद्धा महायुतीचेच सरकार

‘लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी योजना आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होतील, कोट्यवधी बहिणींना याचा लाभ मिळेल. पुढील पाच वर्षे सुद्धा महायुतीचं सरकार येणार आहे, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राऊतांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.

हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो..

‘ लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केले. अशा शुभ कामात काही अशुभ लोक नावं ठेवतात, अशी टाकी भुसे यांनी राऊतांचे नाव न घेता केली. माध्यमं ही राऊतांना जास्त महत्व देतात. हा भोंगा सकाळी सकाळी जनतेची दिशाभूल करतो. हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी शरद पवार यांची करतो. त्यामुळे त्याच्या पोटात दुःख व मळमळ आहे.त्यांच्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही ‘ असा इशाराही भुसे यांनी दिला.

‘ गद्दार 2 ‘ मध्ये संजय राऊत नायक राहतील

भुसे यांनी राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते (राऊत) कुंकू शिवसेनेचे लावतात मात्र चाकरी शरद पवारांची करतात अशी घणाघाती टीका भुसे यांनी केली.