“देवा भाऊ… तुम्हाला तुळजाभवनाची शपथ…”, शिंदे गटाच्या माजी आमदाराचा सल्ला

| Updated on: Jan 12, 2025 | 2:06 PM

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत आहे. आता यावरुन शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक सल्ला दिला आहे.

देवा भाऊ... तुम्हाला तुळजाभवनाची शपथ..., शिंदे गटाच्या माजी आमदाराचा सल्ला
देवेंद्र फडणवीस
Follow us on

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्ष महापालिकेच्या निवडणुकांची तयारी करत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा काल केली. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत आहे. आता यावरुन शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक सल्ला दिला आहे.

रामदास कदम यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या जवळीक बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिले. “देवा भाऊ तुम्हाला तुळजाभवानीची शपथ आहे. हे साप आहेत साप… विष दिल्याशिवाय राहणार नाही. यांना सोबत घेऊ नका”, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला.

“उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा” 

“उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख यांच्या स्मारकात पाय ठेवण्याचा अधिकार नाही. जो माारणूस काँग्रेससोबत गेला, त्याला नाव घेण्याचा अधिकार नाही. माझी विनंती आहे की या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत. त्या अध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करून टाका. त्यांना शिवसेना स्मारक नाही, शिवाजी पार्क बैठकीसाठी पाहिजे”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाच्या हातात काय दिलं?”

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली. एकनाथ शिंदेंनी सव्वा दोनशे आमदार निवडून आणले. गेल्या 35 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या हातात महानगरपालिका होती. गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाच्या हातात काय दिलं?” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थितीत केला.

“हे साप आहेत, यांना सोबत घेऊ नका”

“तो काय म्हणायचा देवा भाऊ, देवा भाऊ; आम्ही सगळे मिळून खाऊ. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काम झालं नाही. ते अडीच वर्षांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी केले”, असेही रामदास कदम म्हणाले.

“अशोक भाऊ तुमच्या हातामधील तिकीट काढण्यात आले. तुमचे तिकीट उद्धव ठाकरेंनी किती कोटीला विकले, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला. पेंग्विन आता देवेंद्र फडणवीसांना भेटायला जातो. एका मुलीने आत्महत्या केली होती ना, दिशा सलियान आता याला भीती लागली. मनोहर जोशी साहेबांना पण सोडलं नाही. त्यांना पण खाली उतरवला. देवा भाऊ तुळजाभवानीची शप्पथ आहे. हे साप आहेत साप,  विष दिलाशिवाय राहणार नाही. यांना सोबत घेऊ नका”, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला.