जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू असतानाच शिंदे गटाच्या आमदाराचा महायुतीला डोस; म्हणाले, “आता आमची…”

| Updated on: Oct 07, 2024 | 11:29 AM

महाविकासाआघाडीचं काही खरं नाही, त्यांची युती होणार की नाही, माहीत नाही. पण अपक्षांचा टेकू आम्हाला लागणार नाही", असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.

जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू असतानाच शिंदे गटाच्या आमदाराचा महायुतीला डोस; म्हणाले, आता आमची...
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता महायुतीतील शिंदे गटाच्या एका आमदाराने जागावाटपावरुन मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. शिवसेनेचा स्ट्राईक रेट प्रचंड वाढलाय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदासाठीचे चेहरे आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले.

“मी आकडा सांगणार नाही”

“आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे, हे सत्य आहे. पण आम्ही किती जागा मागणार यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. कारण मी जर आकडा सांगितला, तर मग वाचाळवीरांना आवरा, अशी टीका माझ्यावर होऊ शकते. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले.

“कुणी काय करेल याचा काही नेम नाही”

“पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट प्रचंड वाढला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच फरक पाहायला मिळेल. आता फार अलर्ट राहायला हवं. कारण कुणी काय करेल याचा काही नेम नाही. राजकारणात रोज नवनवीन प्रयोग सुरु असतात”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.

“अपक्षांचा टेकू आम्हाला लागणार नाही”

“आम्ही दसऱ्याची वाट पाहत आहोत. दसरा मेळाव्यात बरंच काही घडू शकतं. २०-२५ अपक्ष आमदार यंदाच्या विधानसभेत मुख्यमंत्रीपदाची दोर घेऊ शकतात. जर समीकरण वर खाली गेले तर पण सध्या महायुती जोरात आहे. महाविकासाआघाडीचं काही खरं नाही, त्यांची युती होणार की नाही, माहीत नाही. पण अपक्षांचा टेकू आम्हाला लागणार नाही”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.