Kirit Somaiya | ‘दानवे तुम्ही सीडी काढा, XXX काढा’, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ नंतर कोणाला दिला इशारा?

| Updated on: Jul 18, 2023 | 12:58 PM

Kirit Somaiya | "किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाहीये. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे"

Kirit Somaiya | दानवे तुम्ही सीडी काढा, XXX काढा, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ नंतर कोणाला दिला इशारा?
Kirit Somaiya
Follow us on

मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांच्या कथित व्हिडिओवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. भास्कर जाधव यांनी सोमय्यांना क्लीन चीट देणार का? म्हणून थेट देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.

राज्याच्या राजकारणात या कथित सीडीवरुन आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने किरीट सोमय्या यांची बाजू घेतली आहे.

शिवसेनेने घेतली किरीट सोमय्यांची बाजू

“किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाहीये. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे. कुठल्या महिलेचा त्यावर काही आक्षेप नाहीये कुठली तक्रार प्राप्त नाहीये. केवळ आणि केवळ त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळते. कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाहीये” असं संजय शिरसाठ म्हणाले. ते शिवसेनेच प्रवक्ते आहेत.

संजय शिरसाठ काय म्हणाले?

“ज्याने कोणी हे सगळं काम केलेलं आहे. त्या सगळ्यांना आमचं एवढच म्हणणं आहे की, बाबा तुम्ही सावध राहा. भविष्यामध्ये तुमच्या सीडी येऊ शकतात. ठाकरे गटाला मला सावध करायचं आहे. त्यांनी आता संभाळून राहावं, त्यांचाही नंबर लागू शकतो. दानवे तुम्ही हीच कामे करा, सीडी काढा, XXX काढा” असं संजय शिरसाठ म्हणाले.

“धारावी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्यात लोकांना फायदा होईल. लोकहीताचा निर्णय घेतला जाईल., कितीही खोके बोके करा, सरकार स्थिर आहे. विरोधकांना कामधंदे नाहीत” अशी टीका संजय शिरसाठी यांनी केली.