मुंबई : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह काही लोकांवर वनराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “FIR झाली आहे. पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस तपास करत आहेत. CCTV समोर आलं आहे. त्यात तो मुलगा नाही. चुकीचं समर्थन करणार नाही”. असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस वादावरही शीतल म्हात्रे व्यक्त झाल्या.
राहुल गांधी यांनी सभागृहाच्या बाहेर जाताना फ्लाईंग किसने इशारा केला, असा स्मृती इरानी यांनी आरोप केला आहे.
‘राहुल गांधी किती सिरीयस आहेत हे दिसतय’
“राहुल गांधी किती सिरीयस आहेत हे दिसतय. महिलांकडे बघून अशी कृत्य करणं चुकीच आहे. एकीकडे महिलांच्या मान सन्मानाचा गोष्टी करायच्या आणि इकडे अस करायचं. आचार संहिता असते वागताना, त्यामुळे या कृत्याचा निषेध करते” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
आज फ्लाईंग किस आहे, उद्या….
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि रजनी ताई यांनी राहुल गांधी यांचा बचाव केला. त्यावर शीतल म्हात्रे म्हणाल्या की, “कशाचं समर्थन करावं हेही समजलं पाहिजे. त्यांची मजबुरी असावी. वागताना काही काळजी घेतली पाहिजे. आज फ्लाईंग किस आहे, उद्या कुठले वेगळे हावभाव करू शकतात. हे वर्तन विनय भंगात मोडत का हे तपासाव लागेल”असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
योग्य वेळी महापालिका निवडणुका होतील. ते प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यामुळं त्यावर जास्त बोलणे योग्य नाही असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.