दिल्लीत दोन ठग… आमचंच पाप, त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय… उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 08, 2024 | 2:53 PM

"देशावर घाला घातला जात होता. त्यामुळे मी देशभक्त शब्द वापरला. काय चुकलं माझा. महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येत आहे, तो आमच्यासोबत आहे." असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

दिल्लीत दोन ठग... आमचंच पाप, त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Follow us on

Uddhav Thackeray Attack On BJP : “गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता. तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग तिकडे बसले आहे. त्यांनी मुंबईतच नव्हे तर गुजरात आणि देश अशी भिंत तयार केली आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

नुकतंच मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावरही टीका केली. “शिवसेनेप्रमुखांचं एक भाषण दाखवा त्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचं म्हटलं. या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे आमचे आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही जातपात पाहत नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्हाला राम का पावला नाही?”

“प्रत्येक राज्य आणि राज्यातील जनता आपल्या अनुभवाला जागून निर्णय घेत असते. तुम्ही लोकांचा जो आग्रह मांडला. ज्या अपेक्षा शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून मांडल्या आहेत.त्यात वेगळं काय आहे. कारण त्या गोष्टी आपण मांडतच होतो. गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता. तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग तिकडे बसले आहे. त्यांनी मुंबईतच नव्हे तर गुजरात आणि देश अशी भिंत तयार केली आहे. वाराणासीत का पाठी गेले, अयोध्येत का हरले. मला काही लोक भेटले. अयोध्येतील लोक हिंदुत्ववादी नाही का. जिथे राम मंदिर बांधलं, घाई घाईत बांधलं, गळकं बांधलं. एवढं होऊनही तुम्हाला राम का पावला नाही. तुमचा पराभव कुणी केला. हे सर्व केलं ते अदानी आणि लोढासाठी केलं का असं त्या लोकांचं म्हणणं आहे. कारसेवकांना अपंगत्व आलं. पुजारी आणि कंत्राटदारही गुजराती. का आणत आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“आम्ही जातपात पाहत नाही”

“प्रत्येक राज्यात भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे. आम्ही कुणाचे शत्रू नाही. आम्ही न्याय हक्क मागत आहोत. प्रत्येक राज्यात न्याय हक्क मिळवून दाखवा. आमचा लढा काय मुस्लिमांविरोधात आहे का. शिवसेनेप्रमुखांचं एक भाषण दाखवा त्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचं म्हटलं. या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे आमचे आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही जातपात पाहत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी देशभक्त शब्द वापरला, काय चुकलं माझा”

“शिवसेना प्रमुख भाषणाची सुरुवात करायचे. मराठी भगिनीनीं बांधवांनो अशी सुरुवात शिवसेनाप्रमुख करायचे. त्यानंतर त्यांनी हिंदू बंधू भगिनी म्हटलं. मीही निवडणुकीच्या काळात देशभक्त म्हटलं. काय चुकलं माझं. देशावर घाला घातला जात होता. त्यामुळे मी देशभक्त शब्द वापरला. काय चुकलं माझा. महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येत आहे, तो आमच्यासोबत आहे.” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

ही पावलं लोकांनी ओळखली पाहिजे

“नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरज नाही. जे स्वत्व आहे ते टिकवलं पाहिजे. कोणतंही क्षेत्र घ्या. समाजसुधारकांचं साहित्यिकांचं जवानाचं घ्या असं एक क्षेत्र सांगा इतर राज्यांपेक्षा आपला महाराष्ट्र मागे आहे. हा आपला महाराष्ट्र पुढे आहे. मग काय म्हणून या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची. कोण ओळखतं तुम्हाला. हे आमचचं पाप आहे. तुम्ही कोणी नव्हता तेव्हा आम्ही तुम्हाला खांदा दिला. खांद्याचे दोन अर्थ होतात. आताही वाटतं तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाट बघत आहे. तुमचा मतलबीपणा लपून राहिला नाही. वापरा आणि फेकून द्या चाललं आहे. तुम्ही आहात कोण. तुम्ही लोकशाही संपवण्याची भाषा करत आहात. तुम्ही तशी पावलं टाकत आहात. ही पावलं लोकांनी ओळखली पाहिजे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.