अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा नि बक्षीस मिळवा, एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी

| Updated on: Dec 30, 2022 | 6:11 PM

विदर्भाला मोठं बक्षीस दिलं. आम्ही देणारे आहोत. घेणारे नाहीत. देना बँक आहोत घेना बँक नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सुनावलं.

अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा नि बक्षीस मिळवा, एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Follow us on

नागपूर : अतुल भातखडकर यांनी मुद्दा उपस्थित केला होता.उद्योगाच्या प्लाटमध्ये काय घोटाळे झाले. उद्योग येते होतं त्यांच्याकडं कोण टक्केवारी मागत होतं. याची चौकशी होणार आहे. त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं. ते म्हणाले, जे कारखाने गेले त्यातील अनिल अग्रवाल यांनी ट्वीट केलं. आपल्या राज्यातील एकही कारखाना दुसरीकडं जाऊ नये, अशीचं आमची भावना आहे. ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले. त्यातील ४४ हजार कोटीचे प्रकल्प एकट्या विदर्भातील आहेत. यामधून ४५ हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडमध्ये फक्त खनिज उत्खनन होणार नाही. हजारो लोकांना काम मिळणार आहे. स्कील डेव्हलपमेंट होणार आहे. महिलांनाही रोजगार मिळणार आहे. अडीच वर्षात फक्त एका सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. आमच्या सरकारनं गेल्या सहा महिन्यात १८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

कोर्टात होईल ते होईल. आम्ही रिक्त पदं भरत आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कौशल्य विकास, स्वयंरोजगारात यातूनही नोकऱ्या देत आहोत. शिक्षण, पर्यटन, आरोग्य, सामाजिक न्याय अशा सर्व क्षेत्रात सहा महिन्यांत घेतलेल्या निर्णयाचं कौतुक देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलं. कोरोनाकाळात संपूर्ण राज्य निगेटिव्हीटीमध्ये गेलं होतं. सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलं.

शेतात हेलिकॅप्टरनं जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा नि बक्षीस मिळवा. लोकांचं बक्षिस वाचवावं यासाठी आम्ही मुख्यमंत्रीच बदलला. काल विदर्भाला मोठं बक्षीस दिलं. आम्हा देणारे आहोत. घेणारे आहोत. देना बँक आहोत घेना बँक नाही.