श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळलं पण उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल

| Updated on: Dec 26, 2022 | 3:18 PM

तुम्ही अडीच वर्षे घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं असा टोला देखील शिंदे यांनी लगावला यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देखील शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सूनावलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळलं पण उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राज्यात एकीकडे नागपूर येथील अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सुरू असलेल्या कार्यक्रमानंतर लोकसभेच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले आहे. मात्र दुसरीकडे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये आहे. मालेगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमाला ते भेट देणार असून नाशिकमध्ये त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं टाळत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, चार भीतीच्या आत बसलो, घरात बसल तर लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर काम करावं लागतं, लोकांमध्ये मिसळाव लागतं, कार्कर्त्यांना जपावं लागत असा टोला लगावला आहे.

दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत असतांना आतापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक, 50 आमदार आणि 13 खासदार निघून गेले याबाबत आत्मपरीक्षण करायला हवं, लोकं का चाललेत याचा विचार केला पाहिजे.

काय चुकतंय हे तपासायला हवं, हे डबल इंजिन सरकारचं आहे, चांगलं काम करत आहे, राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल, तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं काम मोठ्या मनाने हे सरकार करेल असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

तुम्ही अडीच वर्षे घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं असा टोला देखील शिंदे यांनी लगावला यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देखील शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सूनावलं आहे.

विरोधकांकडे काही प्रश्नच उरले नाहीत, सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चाललाय.

विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्यानं काहीतरी मुद्दे काढायचे, अभ्यास करायचा नाही, फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकचं त्यांचं काम सुरू असून आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीये असेही शिंदे यांनी म्हंटलं आहे.

आज अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील असा टोला लगावत सीमावादावर सरकार गंभीर आहे असे शिंदे यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांच्या बरोबर लोक होते, तेव्हा चांगले होते आणि आता सोडून गेल्यानंतर त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न, तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही, तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करत आहे.

तुमची सकाळ खराब आहे, पण लोकांची पण सकाळ खराब करतायत, लोकांना हे चालणार नाही, लोकांना विकास हवा, तो विकास आमचं सरकार करतय असे म्हणत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांना टार्गेट कुणाला केलं जातं नाही, कुणावर आरोप झाले असतील त्यांचं स्पष्टीकरण झालं पाहिजे, लोकांना सत्य कळलं पाहिजे असे आदित्य ठाकरे यांच्यावर बोलतांना म्हंटलं आहे.