शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते. गद्दार कोण? ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस समोर लोटांगण घातलं. त्यांना गद्दार बोलल पाहिजे. कॉमन मिनिमम प्रोग्राम वर बाळासाहेबांनी सही केली असती का? बाळासाहेबांनी तो कागद फाडून टाकला असता… भावनेच्या भरात वाहत जाऊ नका ज्याने 4 वेळा पक्ष फोडला त्यालाच तुम्ही निवडून देणार?, असं म्हणत दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.
शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. त्याला केसरकरांनी उत्तर दिलंय. बाळासाहेबांचे विचार हे शिवसेनेचे विचार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. राहुल गांधी जेव्हा सावरकरांवर बोलतात तेव्हा तुमचे चिरंजीव त्यांना जाऊन मिठी मारतात. तुम्ही असं चुकीचं बोलत राहिलात तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला बोलवच लागेल, असं ते म्हणाले.
शिवाजी पार्कवरून तुम्ही हिंदुहृदयसम्राट का नाही म्हणू शकला? काँग्रेस लगेच निघून गेली असती. तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला. तुम्ही नाक घासत काँग्रेस सोबत गेलात.ह्याला बाळासाहेबांचा विचार म्हणतात का? ह्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. वडील कोण चोरत तुमच्या आजोबांनी जे ठरवलं ते मोडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? बाळासाहेब सर्वांचे आहेत, असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
महाराष्ट्र तुम्ही चालवता का? मुख्यमंत्री असताना तुम्ही दोन दिवस मंत्रालयात गेले नाहीत. तुम्ही केवळ ऑनलाईन असायचा तेव्हा तुम्ही काय निर्णय घेतलेत. आजपर्यंत वर्षा बंगल्यावर जाऊन मी कधीच रिकामी हाताने आलो नव्हतो. पण तुमच्यामुळे मला वर्षा बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर उभ रहावं लागलेलं. जनतेला वस्तुस्थिती सांगा, असं म्हणत दीपक केसरकर यांनी घणाघात केला आहे.
नरेंद्र मोदींनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. काँग्रेसच्या जाहीर नाम्यात ट्रिपल तलाक 370 कलम पुन्हा आणू असं लिहिलं आहे. त्याला तुम्ही विरोध केलात का. विरोध केला तर आम्ही समजू की तुम्ही बाळासाहेबांचा वारसा चालवत आहात. बाळासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने शिंदेसाहेब चालवत आहेत, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.