सिंधुदुर्ग : जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात 200 फुटांवर कोसळणारा मांगेलीचा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Sindhudurg Mangeli Waterfall in Monsoon tourists Ban)
पर्यटकांना बंदी
सिंधुदुर्ग जिल्हा हा वर्षा पर्यटनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध जिल्हा म्हणून पाहिला जातो. पावसाच्या दमदार हजेरीनंतर दोडामार्ग तालुक्यातील मागेली धबधबा 200 ते 250 फुटावरून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा ठिकाणी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मागेली ग्रामपंचायतीने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
तसेच जे कोणी पर्यटक मज्जाव करून सुद्धा पर्यटनस्थळी येत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे धबधबा नजीक छोटे मोठे व्यवसायिक अवलंबून असतात. मात्र आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरु करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पाहा व्हिडीओ :
(Sindhudurg Mangeli Waterfall in Monsoon tourists Ban)
संबंधित बातम्या :
Vistadome Coach : दख्खनच्या राणीचा सुखद प्रवास, एसी, फिरणाऱ्या खुर्च्या अन् बरंच काही!
VIDEO | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर धुक्यामध्ये हरवले, पर्यटकांचा मात्र हिरमोड
PHOTO | Heritage Train : हिमाचलमधील पर्वतांचे सौंदर्य पाहण्यास सज्ज व्हा, 4 नवीन ट्रेन सुरू