महेश सावंत, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग | 18 ऑक्टोबर 2023 : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. पुण्यातील दंगलबाबत आपल्याजवळ पुरावे होते. हे मी नाही बोलत आहे. आमचा आरोप उद्धव ठाकरेंवर आहे. नीलम गोऱ्हेंवर नाही. नीलम गोरे यांनी माझी बातमी वाचावी. तेव्हाचा बॉस कोण होतं, तर उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे यांना अटक करून नेमकं ते काय करतात. याची चौकशी झाली पाहिजे. मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्याची देखील चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
काल संजय राऊत यांनी ट्विटरवर नागपूरचा व्हिडिओ टाकून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला. पण तोच नियम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेरवरून सरदेसाई मोर्चा घेऊन येतो. पोलिसांना शिवीगाळ करतानाच व्हिडिओ आहे. आमच्याजवळ आहे. उद्धव ठाकरेंचा नातेवाईक असेल तर तुम्ही पोलिसांना शिव्या घालू शकता का?, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
आज सामनाचा अग्रलेख सुनावणी बाबत होता. काही निर्देश दिले आहेत त्याच पालन होईल. पण जे चित्र रंगवलं जात आहे. तोच नियम संजय राऊतांना लागू होत नाही का? कुठला संपदाक किंवा खासदार सकाळी घाण ओकतो? संजय राऊतने कमी बोलावं. त्यामुळे वातावरण थोडं चांगलं होईल. कितीही शिव्या दिल्या तरी विधानसभा अध्यक्ष तुझ्या बाजूने निर्णय देणार नाहीत, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितीन गडकरीसाहेबांच्या घराजवळ यांचा खासदार का पडलेला असतो? नितीन गडकरींना रस्ते कसे बनवायचे हे विचारायची लायकी भास्कर जाधवची नाही. ठाकरे गट आणि राजकारणात अस्तित्व दाखवण्यासाठी भास्कर जाधवचा प्रयत्न आहे. उदय सामंत कॅबिनेट मंत्री झाले आणि हा गल्लीत भुंकतोय. भास्कर जाधव म्हणजे दुतोंडी साप आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांच्यावर टीका केली आहे.