विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग | 01 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर ठेपली आहे. अशातच आता युती आणि आघाडीचं जागावाटप कधी होणार याची सर्वत्र चर्चा होतेय. अशातच काही जागांवर तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कोकणातल्या मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कोकणातील दोन मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना दोन्ही गट दावा करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे कोकणातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत असल्याची माहिती आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत निवडणूक लढण्याची शक्यता असतानाच भाजपकडून या मतदारसंघासाठी तयारी सुरु असल्याची माहिती आहे. त्.ामुळे
शिवसेना या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. अशातच आता असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा होतेय. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत आहे. ‘मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कोण?’ असं स्टेटस किरण सामंत यांनी ठेवलं आहे. अशातच भाजपकडून मात्र रविद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या सूचना आल्याची माहिती आहे. भाजप कडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाल्याची माहिती आहे.