सिंधुदुर्ग : कोकणबरोबर शिवसेनेचे अगदी घट्ट नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोकणाने नेहमीच त्यांच्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. त्यातच नारायण राणे आणि कोकणचा वाद हा शिवसेनेसाठी नवीन नाही. कोकणातील ठाकरे गटाच्या राजकीय घडामोडीमुळे कोकण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणही तसंच महत्वाचं घडलं आहे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्याने वैभव नाईक नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यातच आता वैभव नाईक नाराज असून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
त्यावर बोलताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, ‘मी शिवसेनेत नाराज नाही,माझ्याबाबतीत बातम्या या प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. जिल्हाप्रमुख पद काढून घेतले गेले असले तरी माझा शिंदे गटात जाण्याचा कोणताच विचार नाही. सिंधुदुर्गातील राजकारणात ठाकरे गटाचे वेगळे स्थान आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या जाणीव पूर्वक निर्माण केल्या जात आहे.तसेच मी कोकणातील राजकारणात सत्ताधाऱ्यांना मी पुरून उरलोय असल्याचे खडे बोलही त्यांनी कोकणातील ठाकरे गटाच्या विरोधकांना सुनावले आहेत.
आमदार वैभव नाईक यांचे जिल्हाप्रमुख पद जाणार या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नुकताच नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्री जाणार असल्याचे आपण सांगितले होते. त्या विधानानंतर याबाबत मी शिंदे गटात जाणार असा अपप्रचार सुरू केल्याचेही वैभव नाईक यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख पद जरी माझ्याकडून काढून घेतले असले तरी त्याबाबत मी अजिबाद नाराज वैगरे नाही.
जिल्हाप्रमुख पद काढून घेतले असले तरी मी माझ्या ठाकरे गटाबरोबर बांधिल असून ठाकरे गटाला जेव्हा-केव्हा गरज असेल तेव्हा मी काम करत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची इच्छा आहे की मी त्यांच्यासोबत जावं. मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांचा आणि उद्धव ठाकरे यांच्याशी मी एकनिष्ठ असल्याचे सांगत ऊद्धव ठाकरे जे सांगतील तेच मी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.