Kalicharan Maharaj Statement: कालीचरण महाराज यांचे विचार योग्यच, माझा त्यांना फुल्ल सपोर्ट; भाजपच्या नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Aug 30, 2023 | 1:39 PM

Nitesh Rane on Kalicharan Maharaj Statement : पुण्यात एकीकडे कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; तर भाजपच्या 'या' आमदाराकडून पूर्ण पाठिंबा, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा, वाचा सविस्तर...

Kalicharan Maharaj Statement: कालीचरण महाराज यांचे विचार योग्यच, माझा त्यांना फुल्ल सपोर्ट; भाजपच्या नेत्याचं वक्तव्य
Image Credit source: Kalicharan Maharaj FB
Follow us on

सिंधुदुर्ग | 30 ऑगस्ट 2023 : कालीचरण महाराज विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवजयंती दिवशी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. असं असताना भाजपच्या आमदाराने कालीचरण महाराज यांच्या वक्तल्याचं समर्थन केलं आहे. त्यांना पाठिंबा दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना कालीचरण महाराजांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आपलं समर्थन असल्याचं नितेश राणे म्हणाले.

कालीचरण यांच्यासोबत असंख्यवेळी मी व्यासपीठावर राहिलेलो आहे. कालीचरण महाराज म्हणजे हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि हिंदुत्वाबाबत परखड मत कालीचरण महाराज मांडत आलेले आहेत. गुन्हा दाखल झाला असेल तर पोलिसांनी चौकशी करावी. पण कालीचरण महाराज यांचे विचार हिंदुत्वासाठी पोषक आहेत. हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांच्या विचारांमध्ये काहीही चुकीचं नाही. त्यांच्या विचारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. मुंबई गिळंकृत करण्याचा मोदी-शाहांचा डाव असल्याचं राऊत म्हणालेत. यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी नीती आयोग बाबत टीका केली. मुंबई महाराष्ट्र राज्यपासून तोडणार अशी जुनी टेपरेकॉर्डर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती, असं पलटवार नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबईला पाटणकर आणि सरदेसाई यांच्याकडून धोका आहे. मुंबईला कोण गिळत होतं तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी… मुंबई वाचवण्याचं काम मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लाचार कोण, खोटारडा कोण हे सर्वांना माहीत आहे.संजय राऊत यांनी अनेक भाकीतं केली. त्यातील एकही भाकीत खरं झालं नाही. अटक होण्याच्या भीतीने राऊत बोलत आहेत. पण 2024 ला पुन्हा एकदा आमचं सरकार सत्तेत येणार आहे. तेव्हा जेलमध्ये बसून राऊत शपथविधी बघतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.