विधानसभा निवडणूक सुरु आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत नितेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. हल्ली संजय राऊत आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे गोडवे गात आहेत. याला असं म्हणायचं का ये अंदर कि बात है संजय राऊत हमारे साथ है!, असं नितेश राणे म्हणालेत. एअर बस प्रकल्प गुजरातला नेला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. संजय राऊत याला पत्रकार परिषदेत चपलांनी मारलं पाहिजे होते. ह्याला प्रत्येक गोष्टीत मोदी साहेब दिसतात हा स्वतःच्या बायकोला नाव घेऊन हाक मारतो कि नरेंद्र मोदी बोलतो हे त्याला विचारलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणालेत.
शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावं. कारण त्यांचं काँग्रेस कचरा करतंय. दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित नाही केला. बेडकासारखा फुगून आम्ही सेंच्युरी मारणार बोलणाऱ्या बालबुद्धी राऊतला हे समजत नाही. सेंचुरी मारण्यासाठी 100 जागा लढवाव्या लागतात. 88 वर स्वतःच्या पक्षाला गुंडाळावं लागलं, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
भाजपसोबतचा इतिहास तपासा तेव्हा कसे होता… राहुल गांधीच्या डाव्या उजव्या सोबत उद्धव ठाकरेला भागवावं लागत आहे. राहुल गांधी यांच्याजवळ पास पण नाही. सत्तेच्या भुके पाई उद्धव ठाकरे फडणवीस साहेबांचे फोन घेत नव्हता. आज राहुल गांधी याचे फोन घेत नाही याला नियतीचा फेरा म्हणतात, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
लोकसभेतील सांगली पॅटर्नचा उल्लेख सध्या वारंवार होत आहे. सांगलीचा दाखला आहे हा दाखला होऊ शकत नाही अपक्ष का प्रथमच जिंकत आहेत का? देशात याआधी देखील अपक्ष जिंकले आहेत. सांगली पॅटर्न हा महाराष्ट्राचा लोकप्रिय नाही आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडीचा का सर्वांनी केलं असतं तर निश्चितपणे शिवसेनेचा उमेदवार तिकडून निवडून आला असता, असं संजय राऊत म्हणाले. यावर नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरेला रात्री झोप लागत नाही वाईन चा एक पेग वाढलाय आणि संजय राऊत चा 90 चा पेग वाढलाय, असं राणे म्हणाले.