महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. कोकणातही यंदा तगडी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आज बोलताना एक विधान केलं. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आज तुम्ही भर उन्हात बसले आहात मी तुमचे ऋण कधी विसरणार नाही. आज माझे बाबा नाहीत आज त्यांना आनंद झाला असता. 50 खोके मंत्री बघून मी नाही गेलो. मला अनेक ऑफर होत्या. माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा, असं वैभव नाईक म्हणालेत. त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीतील भ्रष्टाचार मी बाहेर काढला. तेव्हा माझ्या कुटुंबाने पाकिस्तानमध्ये जावं अस सांगण्यात आलं. असे विरोधक दुष्मानाला सुद्धा मिळू नये. कणकवलीचे आमदार मी विकास केला नाही अस सांगत होते. तुमच्या कडे भ्रष्टाचार मुक्त विकास काम झाले असतील तर सांगा आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतो. अनेक विकास काम मी केली. केसरकरांनी केवळ आश्वासन दिली, असं म्हणत वैभव नाईक शिंदे गटावर टीका केली आहे.
नारायण राणे यांची दोन्ही मुले आमदार आहेत. कारण कणकवली मध्ये एक बंगला एका मुलाला आणि मालवणमधील एक बंगला आणि व्यवसाय मुलांना द्यायचे आहेत. मी काम केली नाहीत. तर सिद्ध करा मी उमेदवार अर्ज मागे घेतो. लोकसभा निवडणुकीवर भ्रष्टाचाराचे पैसे वाटले गेले. माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत. ते सत्तेत होते. मी केलेलं काम आणि त्यांनी केलेली काम ह्याची तुलना करा आणि मगच मला मतदान करा, असं आवाहनही वैभव नाईक यांनी मतदारांना केलं आहे.
आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्याच प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्या. तुम्ही मंत्री असताना किती उद्योग आणलेत? मी लोकांसाठी राजकारणात आहे. आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही तुम्हाला 2 हजार रुपये देऊ, असा शब्द वैभव नाईक यांनी दिला.