मोबाईल साधा असला तरी कव्हर पाहिजे, मग डोक्याला हेल्मेट का नाही बरं ? चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 04, 2024 | 1:04 PM

दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणं... हा बेसिक नियम आणि आपल्याच आयुष्यासाठी ते महत्वाचं ठरतं. पण ही एवढीशी क्षुल्लक गोष्टही अनेकांच्या लक्षात रहात नाही. बाईकवर, स्कूटीवर बसले आणि भुर्रssss करून जातात, असे अनेक लोकं आपण आपल्या आजूबाजूला बघतो.

मोबाईल साधा असला तरी कव्हर पाहिजे, मग डोक्याला हेल्मेट का नाही बरं ? चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल
Follow us on

दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणं… हा बेसिक नियम आणि आपल्याच आयुष्यासाठी ते महत्वाचं ठरतं. पण ही एवढीशी क्षुल्लक गोष्टही अनेकांच्या लक्षात रहात नाही. बाईकवर, स्कूटीवर बसले आणि भुर्रssss करून जातात, असे अनेक लोकं आपण आपल्या आजूबाजूला बघतो. अतिशय वेगाने चालणाऱ्या, वाकड्या तिकड्या कुठेही घुसणाऱ्या बाईक्स आणि त्यावरचे लोक हे सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. वाहतूक पोलिस, प्रशासन सर्वच जण समजावून थकले पण लोकांना काही फरक पडत नाही. पुण्यातही हेच चित्र सध्या दिसंतय.

पण आता पुण्यातील एका चिमुकलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेट घालावं, जीव सुरक्षित ठेवावा या भावनेने तिने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील मोशी भागातील श्रीशा लोंढे ही चिमुकली सर्व नागरिकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करत आहे. या भागातील एक सिग्नलवर उभी राहून, हातात फलक घेऊन ती जनजागृती करताना दिसत आहे. “मोबाईल साधा असला तरी त्याला कव्हर असतं मग डोक्यावर हेल्मेट का बरं नसतं ?” असा लिहीलेला फलक हातात धरून ती उभी होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये ती गजबजलेल्या सिग्नलजवळ उभी राहून लोकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करताना दिसत आहे. तिच्या या जनजागृती मोहिमेला वाहतूक पोलिसांचाही पाठिंबा असून त्यांनी लोकांना हेल्मेट घालण्याचे, सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. अनेक नागरिकांनी श्रीशाचे फोटो काढले. तर काहीनीं तिला थम्ब्स अप करत, तिच्या या मोहिमेलाही पाठिंबा दर्शववला आहे. वाहतूक पोलीस देखील नागरिकांना या चिमुकलीचा संदेश दाखवत विदाऊट हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.