Kolhapur News: झोपेत असलेल्या मायलेकींवर नाग सापाचा दंश; शाळकरी मुलीचा मृत्यू; आईवर उपचार सुरू

| Updated on: Aug 25, 2022 | 11:57 AM

भामटे गावातील यादव यांच्या शाळकरी मुलीचा सापाने दंश करुन मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ज्ञानेश्वरीची आई नीलम यांचीही प्रकृती चिंतानजन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Kolhapur News: झोपेत असलेल्या मायलेकींवर नाग सापाचा दंश; शाळकरी मुलीचा मृत्यू; आईवर उपचार सुरू
कोल्हापुरातील भामटेमध्ये मायलेकींना सापाने दंश केल्याने मुलगी ठार, आई गंभीर
Follow us on

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील भामटे (Bhamate Kolhapur) या गावामध्ये रात्री झोपेत असलेल्या मायलेकींवर विषारी नागाने दंश केल्याने शाळकरी मुलीची मृत्यू झाला असून तिची आई गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सापाने दंश (Snake Attack) केल्यामुळे मुलीचा मृत्यू (Daughter Death) झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून यामध्ये मृत झालेल्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी यादव असून तर जखमी असलेल्या आईचे नाव नीलम यादव असल्याचे सांगण्यात  येत आहे.  या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी सापाने चावल्यानंतर आणि ज्ञानेश्वरीने आपल्याला सापान चावल्याचे सांगितल्यानंतर धावपळ करुन मायलेकींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच ज्ञानेश्वरीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी सचिन यादव यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना ही दुर्घटना घडली.

झोपेत सापाचा दंश

रात्रीच्या वेळी झोपेत असताना पहिल्या प्रथम ज्ञानेश्वरीला सापाने दंश केला. त्यावेळी तिने आपली आई नीलमला ही घटना सांगितली. त्यावेळी तिच्या आईलाही नागाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्या दोघींना तात्काळ कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात दोघींवर उपचार सुरू करण्यात आले मात्र यामध्ये शाळकरी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गावावर शोककळा

भामटे गावातील यादव यांच्या शाळकरी मुलीचा सापाने दंश करुन मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ज्ञानेश्वरीची आई नीलम यांचीही प्रकृती चिंतानजन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ओलाव्यामुळे प्राण्यांचा मानवी वसाहतीत वावर

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे नदी परिसरातील अनेक गावामधून पुराचे पाणी पसरले होते, त्यामुळे सापांचा वावर गाव आणि घर परिसरात वाढला आहे. सध्या सगळीकडे ओल असल्याने प्राणी ओल नसलेल्या जागेच्या शोधात साप, विंचू असे प्राणी असल्याने हे प्राणी घरात येऊन बसत आहेत, त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे नागरिक सागंत आहे.