अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अण्णा हजारे यांचे मोठे विधान, म्हणाले…

| Updated on: Sep 16, 2024 | 4:56 PM

Anna Hazare Reaction on Arvind Kejriwal Resignation : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. जामीनावर बाहेल आल्यावर केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अण्णा हजारे यांचे मोठे विधान, म्हणाले...
Follow us on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. बाहेर आल्यावर केजरावाल यांनी रविवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. केजरीवालांच्या राजीनाम्याने दिल्लीच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. केजरीवाल यांनी आगामी निवडणुकीमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचंही सांगितलं. मात्र केजरीवालांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राजीनामा दिल्या असल्याची टीका विरोधक करत आहेत. अशातच यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी सुरूवातीलाचा अरविंद केजरीवाल यांना समाजसेवा करत राहा, राजकारणात जाऊ नका. भविष्यात मोठे माणूस होताल, असं सांगितलं होतं. आम्ही अनेक वर्षे सोबत राहिले आहोत. त्यावेळी मी त्यांना कायम सांगत होतो की राजकारणामध्ये न जाता समाजसेवा करा. समाजसेवा केल्याने खूप आनंद मिळतो. परंतु मी दिलेला सल्ला त्यांनी ऐकला नाही आणि आता या परिस्थितीला सामोर जावं लागत असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा भाजपच्या लोकांनी केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा का दिला नाही, असे विचारले. मी तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे की तुम्ही केजरीवाल मानता का? जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले होते.

अरविंद केजरीवालांना या अटीवर जामीन मंजूर

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाता येणार नाही.

या प्रकरणाबाबतीत बाहेर कुठेही चर्चा करता येणार नाही

या प्रकरणातील तपासामध्ये अडथळा किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही

गरज लागली तर कोर्टात हजर राहून तपासामध्ये सहकार्य करणार

केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार की राहणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सहानुभूतीच्या जोरावर मते मागणे हे या पाऊलामागचे कारण आहे, असे मला वाटते. राजीनामा का देत आहे, याबाबत त्यांची स्वतःची रणनीती आहे. राजीनामा द्यायचाच होता तर तुरुंगात जात असताना करायला हवा होता, असं काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी म्हटलं आहे.